सिल्लोड, (प्रतिनीधी) पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत व दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी पतीस सोमवारी अजिंठा पोलिसांनी अटक करून सिल्लोड न्यायालयात हजर केले असता बुधवारी (२५) सिल्लोड न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आएशा हल्ली मु डिसेंम्बर न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपीचे नाव अरबाज सलीम शेख रा भिवंडी असे आहे.
आत्महत्या केलेल्या अरबाजच्या पत्नीचे नाव बेगम अरबाज शेख वय २३ रा अजिंठा हसूल जि संभाजीनगर असे आहे. २४ रोजी घरात तिने आत्महत्या केली होती आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आएशा बेगम अरबाज शेख (वय २३ रा, अजिंठा, ता. सिल्लोड, हल्ली मु, हसूल, जि. संभाजीनगर) असे आहे. आत्महत्या प्रकरणी विवाहितेची आई नूरजहाँ बेगम शेख रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मयत विवाहितेचा पती नामे अरबाज सलिम शेख, सासू सायरा सलिम शेख, जेठ अलिम सलिम शेख सर्व रा. ९११ किदवई नगर नायगांव रोड, मोहम्मदीया मस्जिद जवल, भिवंडी, ठाणे या सर्व आरोपिं विरुद्ध हर्सल पोलिस स्टेशन येथे विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी अरबाज सलीम शेख यास पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता त्यानंतर बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी आरोपी अरबाज याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन अर्ज प्रकरणी फिर्यादीच्या वतीने अॅड. अरुण डापके, अॅड. महेश राऊतराय, अॅड. चंद्रमणी निसर्गन्ध, अॅड. आकाश बावणे यांनी काम पहिले.












